भुसावळात शहरात भरदिवसा दहा लाखांची धाडसी घरफोडी


Daring burglary of ten lakhs in broad daylight in Bhusawal city भुसावळ  : भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील श्रीहरी नगरातून चोरट्यांनी तब्बल दहा लाखांची रोकड लांबवल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
मुकेशकुमार राधाकिसन कुमावत (45) हे मिस्तरी काम करतात व कुटूंबासह श्रीहरी नगरात वास्तव्यास आहेत. रविवार, 7 रोजी दुपारी 2.30 ते 3.36 दरम्यान कुमावत कुटूंब बाहेर जाताच पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधली. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोफा कुशनमध्ये ठेवलली नऊ लाख 90 हजारांची रोकड लांबवली. काही वेळात कुमावत कुटूंब घरी आल्याने घरफोडीचा प्रकार समोर आला. तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, प्रभारी निरीक्षक गजानन पडघण आदींनी भेट दिली. माहितगार चोरट्यांनी घरफोडी केल्याचा अंदाज आहे. तपास पोलिस निरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !