अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंचखेड्यातील गुराख्याचा मृत्यू


A cowherd in Chinchkheda died after being hit by an unknown vehicle मुक्ताईनगर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चिंचखेडा येथील गुराख्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 7 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दिवाकर वसंत निकम (30, चिंचखेडा बु.॥) यांच्या फिर्यादीनुसार, वसंत रावजी निकम (65) हे रविवार, 7 रोजी सायंकाळी सात वाजता वायला फाट्याकडून गावाकडे गुरे-ढोरे आणत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. तपास पोलिस नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !