भुसावळातील तरुणाला टास्क देण्याच्या बहाण्यााने सात लाखांचा गंडा


Extortion of seven lakhs on the pretext of giving a task to a young man from Bhusawal भुसावळ : टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने शहरातील तरुणाला सात लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आमिष दाखवत घातला गंडा
शोयब खान रऊफ खान (38, आयाल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) या तरुणाने सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अनिकामहेशजॉब या लिंकवरून विविध टास्क देण्यात आले व हे टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले व या आमिषाला भाळून खान यांनी 17 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान त्यांच्या आई व पत्नी यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी सहा लाख 91 हजार 78 रुपये ऑनलाईन संशयिताच्या खात्यावर ट्रान्सपर केले मात्र त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही व फसवणूक झाल्ल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात 11 जानेवारी 2024 रोजी तक्रार दिल्यावरून अनिकामहेशजॉब या युजर आयडी चालकाविरोधात तसेच 7640840232 व 9863502307 या क्रमांक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !