भुसावळात दुकानदार महिलेचे 90 हजारांचे मंगळसूत्र धूम स्टाईल लांबवले


Mangalsutra dhoom style of 90 Hajar of shopkeeper woman extended in Bhusawal भुसावळ : भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील प्रिमीयर हॉटेलच्या मागे असलेल्या रेणूका जनरल स्टोअर्समधून पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन युवकांनी सिगारेट घेतली व सिगारेट घेत असताना महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. ही घटना शनिवार, 13 जानेवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.

धूम स्टाईल चोरीने महिलावर्गात खळबळ
जामनेर रोडवर असलेल्या प्रिमीयर हॉटेलच्या मागे रेणूका जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर दोन युवक आले. त्यांनी दुकानात जात दुकानात असलेल्या विजया हरी सपकाळे (62, जामनेर रोड, भुसावळ) यांना सिगारेटची मागणी केली. सिगारेट घेतल्यावर एका भामट्याने महिलेच्या गळ्यात असलेली 60 हजारांची चैन व 30 हजारांचे मंगळसूत्र तोडत धूम स्टाईल दुचाकीवरून पळ काढला. सपकाळे यांनी आरडा-ओरड केली मात्र भामटे पसार होण्यात यशस्वी झाले होते.



पोलिसांची धाव : सीसीटीव्हीवरून चोरट्यांचा माग
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी डीबी विभागातील कर्मचार्‍यांनी पिीसरातील सीसीटिव्ही फुटेजची पहाणी केली. त्यात दोन्ही भामट्यांची छबी कैद झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा विजया सपकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !