तळवेल गावातून ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली


A tractor trolley was extended from Talvel village भुसावळ :  भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील बसस्थानक परीसरातील मोकळ्या जागेतून ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यासंदर्भात शुक्रवारी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
मधुकर पुंडलिक पाटील (72, रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड, तळवेल, ता.भुसावळ) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांच्या मालकीची ट्रॅक्टरची ट्राली क्रमांक (एम.एच.19 बी.क्यू .2442) ही गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पार्क केली होती. 3 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता ते 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली 40 हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली हा प्रकार लक्षात आल्यानंतर मधुकर पाटील यांनी शुक्रवार, 12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता वरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !