भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्याला मारहाण ; परप्रांतीय प्रवाशाला अटक
Railway Security Force employee assaulted in Bhusawal ; A foreigner was arrested भुसावळ : स्कॅनवर बॅगची तपासणी करण्यास सांगितल्यानंतर राग आलेल्या परप्रांतीय प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्याला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री 10.35 वाजता रेल्वे स्थानकावर घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात प्रवाशाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
हुज्जत घालत केली मारहाण
भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री 10.35 वाजेच्या सुमारास मुसाफिर खान्यात असलेल्या लगेज स्कॅनरवर आरपीएफ जवान प्रकाश तुर्कले हे कर्तव्यावर होते. रात्री 10.35 वाजेच्या सुमारास एका प्रवाशाला स्कॅनर मशीनमध्ये त्यांनी बॅगची तपासणी करण्यासाठी टाकण्यास सांगितले असता प्रवाशाने वाद घातला व अचानक कर्मचार्याला मारहाण सुरू केली. आरपीएफ उपनिरीक्षक एन.के.सिंग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशाने यावेळी प्रवाशांशी व लोकांशी हुज्जत घातली.


पोलिस कर्मचारी भूषण पाटील व उपस्थितांनी संशयित प्रवाशाला लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हवालदार प्रकाश तुर्कले यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित प्रवासी राजकुमार प्रसाद (36, रा.शेंभूपूर, पोलिस स्टेशन चनपटिया, पोस्ट चनपटिया, जि. पश्चिम चंपारण, बिहार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरपीएफ प्रकाश तुर्कले यांच्यावर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
