किन्ही एमआयडीसीतून लोखंडी खिडकी लांबवली


Iron window extended from some MIDC भुसावळ : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसीतून चोरट्यांनी पाच हजार रुपये किंमतीची लोखंडी खिडकी लांबवली. 11 ते 13 जानेवारीदरम्यान ही चोरी झाली.

याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव अनिल तायडे (23, स्नेहनगर, प्लॉट क्रमांक 18, एसएसजीबी कॉलेजजवळ, झेटटीसी, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, किन्ही एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एच 96 मधून चोरट्यांनी 40 किलो वजनाची व पाच हजार रुपये किंमतीची लोखंडी खिडकी चोरून नेली. तपास हवालदार सुभान तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !