जळगावात घरफोडीचे सत्र कायम : 50 हजारांचा ऐवज लांबवला


Burglary session continued in Jalgaon : compensation of 50 thousand extended जळगाव : जळगाव शहरातील वाघुळदे नगरातील भिकमचंद जैन नगरात बंद घराचा कडी-कोयंडा चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 49 हजार 370 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
कैलास गजानन कवडीवाले (62, रा.भिकमचंद जैन नगर, वाघुळदे जैन, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 26 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता ते घर बंद करून बाहेरगावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.



चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 49 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. हा प्रकार शनिवार, 27 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता समोर आला. घरात चोरी झाल्यानंतर कैलास कवडीवाले यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार किशोर निकुंभ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !