प्लॉट खरेदीत जळगावच्या वयोवृद्धाची पाच लाखांमध्ये फसवणूक
An elderly man of Jalgaon was cheated of five lakhs in the purchase of a plot जळगाव : नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन व बुकिंग म्हणून दिलेले चार लाख 95 हजार 390 रुपये परत न देता खोटे दस्तावेज देऊन गोपालसिंग भीमसिंग राजपूत (66, रा.पिंप्राळा, जळगाव) यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवार, 26 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता याप्रकरणी नाशिक येथील चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
सेवानिवृत्त असलेले गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी ठाणगाव, ता.सिन्नर, जि.नाशिक येथील प्लॉटसाठी दोन हजार 200 रुपये टोकन म्हणून दिले होते. त्यानंतर बुकिंगसाठी दोन लाख 40 हजार 390 रुपये दिले. त्यानंतर दुसर्या भागातील प्लॉट घेण्यासाठी दोन लाख 55 हजार रुपये दिले. एकूण चार लाख 95 हजार 390 रुपये धनादेश व रोखीने दिले होते. मात्र खरेदी खत करून न देता खोटे दस्तावेज दिले तसेच घेतलेली रक्कमदेखील परत दिली नाही.


असे आहेत संशयित आरोपी
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नाशिक येथील वैभवलक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. सदर कंपनीचे संचालक प्रशांत एन.शेंडे (59), योगेश एन.शेंडे (48), व्यवस्थापक राजेंद्र वसंतराव खैरनार (61, सर्व रा.नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक किशोर पवार करत आहेत.
