जळगावातील कुविख्यात डोया सपकाळेसह दोघे हद्दपार


The two were deported along with the notorious Doya Sapkale of Jalgaon जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या जळगावातील कुविख्यात आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (23) व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (20, रा.कांचननगर जळगाव) यांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

संशयितांविरोधात 13 गुन्हे दाखल
दोघांविरोधात जळगावच्या शनिपेठ, जिल्हा पेठ, जळगांव शहर, जळगांव तालुका, एरंडोल पोलीस स्टेशनला खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, दुखापत, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तब्बल 13 गुन्हे दाखल होते.



शनिवारी पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
दोघा गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपा करण्याबाबत शनिपेठ पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी प्रस्ताव सादर केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार युनूस शेख इब्राहिम, सुनील पंंडीत दामोदरे यांनी याप्रकरणी कामकाज पूर्ण केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हद्दपारीचे आदेश काढले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !