जळगाव सुवर्णनगरीत आरसीएफ युरीया गोल्डच्या भारतातील पहिल्या रॅकचे जल्लोषपूर्ण स्वागत
India’s first rack of RCF Urea Gold at Jalgaon Suvarnanagari gets a rousing welcome जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) यांच्याद्वारे प्रधानमंत्री जन उर्वरक परियोजना अंतर्गत युरिया गोल्ड (सल्फर कोटेड युरीया) चे भारतातील पहिल्या रॅकचे जल्लोषपूर्ण स्वागत झाले. यावेळी कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, मोहिम अधिकारी विजय पवार, एमआयडीचे विभागीय व्यवस्थापक इंगळे, आरसीएफ जळगाव जिल्हा प्रभारी जाकीर शेख, अधिकृत विक्रेते , उप-विक्रेते, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कमी मात्रात जादा परीणाम
युरीयया गोल्डमध्ये 17 टक्के सल्फर व 37 टक्के नायट्रोजेन आहे ज्यामुळे मातीतील सल्फरची कमतरता भरून काढली जाते. याची विशेषता म्हणजे कमी मात्रात जास्त परिणाम, मातीतील पोषक तत्वांची सुधारणा , उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ, शेतकरी बंधूंना जास्त आर्थिक लाभ, नायट्रोजन सोबत सल्फर प्रकार उपलब्ध (नायट्रोजन 37% आणि सल्फर 17%). प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि परिसरातील शेतकरी बांधवांकरिता हि एक सुवर्ण संधी आहे. युरीचा गोल्डचा लाभ घेण्याचे आवाहन आरसीएफ जळगावचे प्रमुख जाकीर शेख यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता युरिया गोल्ड ची मुबलक उपलब्धता आणि सुवर्ण लाभ घेता येणार आहे.


