जळगावात पुन्हा धूम स्टाईल 74 हजारांचे मंगळसूत्र लांबवले
Mangalsutra of 74 thousand was extended again in Dhoom style in Jalgaon जळगाव : जिल्ह्यात पुन्हा धूम स्टाईल चोर्या सुरू झाल्याने महिलावर्ग धास्तावला आहे. भुसावळसह मुक्ताईनगरात अशा चोर्या झाल्यानंतर जळगावातही असाच प्रकार घडला. जळगावात रुची लक्ष्मी काबरा (45, रा. अभियंता कॉलनी) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार, 29 जानेवारी रोजी आठ वाजता रूची काबरा या महिला शहरातील हनुमान कॉलनी परिसरातून पायी जात असतांना त्या वेळी दुचाकीवरून दोन जण आले व त्यांच्या गळ्यातील 26 हजार रुपये किंमतीची साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसे 47 हजारांची व आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत ओढून पोबारा केला.
धूम स्टाईल चोर्या वाढल्या
74 हजारांचा ऐवज चोरट्यांनी अवघ्या क्षणात लांबवला. या प्रकारानंतर काबरा यांनी आरडाओरड केली परंतु तोपर्यंत दोन्ही अज्ञात भामटे सोन्याचे मंगळसुत्र घेवून पसार झाले काबरा रामानंद नगर पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर सोमवारी रात्री 10 वाजता दुचाकीवरील अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक रोहिलास गभाले करीत आहेत.


