जळगाव दुध फेडरेशनमध्ये नोकरी लावण्याचे आमिष : मुक्ताईनगरच्या तरुणाला 13 लाखांचा गंडा


मुक्ताईनगर : माझे राजकीय लोकांशी चांगले संबंध आहेत. तसेच मी जळगाव येथे सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे तुमच्या नोकरीचे काम कृषी महामंडळ किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये करून देईल, अशी बतावणी करून तरुणाकडून वेळोवेळी साडेतेरा लाखांत गंडवल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात अधिक असे की, फकिरा अर्जुन सावकारे (वय-25 व्यवसाय शेती,शिक्षण) हे आपल्या परिवारासह रा. भोकरी ता. मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी 12 वी नंतर फिटर कोर्स केलेला आहे. नोकरीच्या शोधात असतांना त्यांची प्रमोद शांताराम सावदेकर (रा. जळगाव ता. जि. जळगाव) सोबत ओळख झाली होती. त्यावेळी प्रमोद सावदेकरने फकीरा सावकारे यांना सांगितले की, मी माझी राजकिय लोकांशी ओळख आहे व मी सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलय जळगाव येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. तुमचे नोकरीचे काम करायचे असल्यास तुम्हाला मी जळगाव कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय या विभागात सहाय्यक व्यावस्थापक या पदावर किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावुन देतो असे आमिष दाखविले. त्यानंतर शेख जावेद शेख रहीम या मित्रासमोर दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी सावदेकर यांना 5 लाख रोख दिले, असे फकिरा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !