जळगावातील वयोवृद्धाचा अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी देत उकळली 43 लाखांची खंडणी


An extortion of 43 lakhs was made by threatening an elderly person in Jalgaon with a viral video जळगाव : व्हिडीओ कॉल करून महिलेने एका 65 वर्षीय वृद्धाचा नग्न व्हिडिओ शुट केला. त्यानंतर त्याला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो डिलीट करायच्या नावाखाली त्यांच्याकडून 43 लाख 3 हजार 490 रुपयांची खंडणी उकळल्याची घटना जळगावात घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे खंडणी प्रकरण
या संदर्भात पिडीत वृद्धाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 च्या दरम्यान, वेळोवेळी पुजा शर्मा, संजय माथुर मोबाईल क्रमांक- 9395338456, 8817508657, राहुल शर्मा मोबाईल क्रमांक- 6002127604, 8058441960 यांनी त्यांच्या मोबाईलवर मॅसेजेस आणि व्हिडीओ कॉल करुन, माझ्या कामोद्दीपक भावना उत्तेजीत केल्यात. तसेच पीडीत वृद्धाचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर सदर व्हिडीओ युटयुबवर व्हायरल झाला असून, तो डिलीट करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील. अन्यथा तुमच्या घरी पोलीस पाठवुन तुमच्या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याची पिडीत वृद्धाला धमकी दिली आणि ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडुन वेळोवेळी एकुण 43 लाख 3 हजार 490 रुपये खंडणीच्या स्वरुपात विविध बैंकाव्दारे स्विकारली.



अखेर पोलिसात गुन्हा
त्रास असह्य झाल्यानंतर पिडीत वृद्धाने शेवटी जळगाव सायबर पोलिसात संजय माथुर मोबाईल क्रमांक- 9395338456, 8817508657 आणि राहुल शर्मा याचा मोबाईल क्रमांक 6002127604 असे बनावट नाव सांगणारे मोबाईल धारक व बैंक खाते धारकाविरुध्द तक्रार दिली. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील ह्या करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !