जळगावात घरफोड्यांचे सत्र कायम : समता नगरातून 43 हजारांचा ऐवज चोरीला
Burglary season continues in Jalgaon: Rs 43,000 stolen from Samta Nagar जळगाव : शहरात घरफोड्यांचे सत्र कायम आहे. शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी जवळ ईश्वर रामदास चव्हाण व त्यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत भाऊ अजय प्रल्हाद चव्हाण हे वास्तव्याला आहे. त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने दोन्ही घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि घरातील गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर पंप, टीव्ही, होम थिएटर, घरातील भांडी आणि दुचाकी असा एकूण 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता समोर आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
चोरीनंतर ईश्वर चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहे.


