जळगावातील उपजिल्हाधिकार्‍यांवर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला


Deadly attack by sand mafia on Sub-District Officer in Jalgaon जळगाव : जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. हा प्रकार मंगळवारी रात्री घडली. वाळूच्या डंपरवर कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी गेल्यानंतर हल्ला करण्यात आला.

जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी थांबेना
जळगवचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे मंगळवारी रात्री भुसावळच्या दिशेने शासकीय कार्यक्रमाला जागा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना पावणेबारा वाजेच्या सुमारास त्यांना राष्ट्रीय महामार्गावर महेंद्रा शोरूमच्या जवळ वाळूचे डंपर दिसले. त्यांनी तहसीलदार बनसोडे यांना या डंपरवर कारवाई करण्याचे सांगितले. यानुसार कारवाई सुरू असतांनाच दुसरे डंपर आले. तर, थोड्याच वेळात दुचाकी व चारचाकीतून वाळू माफिया आले.



या टोळक्याने निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार व तहसीलदार बनसोडे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. यात सोपान कासार हे जखमी झाले असून त्यांच्या शासकीय वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकार्‍यांनी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले. या प्रकरणात काही संशयितांना अटक करण्यात आली असून सोपान कासार यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच एरंडोल येथील प्रांताधिकार्यांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतांना थेट निवासी उपजिल्हाधिकार्यांवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !