जळगावात खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू
Murder suspect dies during treatment in Jalgaon जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व कारागृहातील बंदीवान भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (40) याचा मंगळवार, 6 रोजी सकाळी 6.30 वाजता उपचार घेताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. घटना कळताच तुरुगांधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दुपारी न्यायाधीशांनी थेट रुग्णालयात जावून घटनेची माहिती घेतली. गुन्ह्यात अटक झाल्यापासून भीमा उर्फ पंकज वाणी कारागृहात बंदीवान म्हणून वास्तव्यास होता. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आजाराने तो त्रस्त होता.
उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
शनिवार, 3 फेब्रुवारी रोजी भीमा उर्फ पंकज वाणी याची पुन्हा अचानक प्रकृती अस्वस्थ झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची प्रकृती अधिक खालावली. उपचाराला प्रतिसाद मिळून शकल्याने सकाळी 6.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.


न्यायाधीशांची धाव
घटना कळताच तुरुगांधिकार्यासह कर्मचार्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दुपारी दुसरे सहदिवाणी न्यायधिश क.स्तर व न्यायदंडाधिकारी प्र वर्ग न्या. आर.आय. सोनवणे हे रुग्णालयात पोहोचले. शवविच्छेदन कक्षात जावून मृत भीमा वाणी यांचा मृतदेह पाहिला. वैद्यकीय अधिकार्यांकडून त्याच्या आजाराबद्दल तसेच उपचाराबद्दल माहिती घेतली. तुरुंग शासनाकडूनही त्याच्या प्रकृतीबाबत व उपचाराबद्दल चौकशी केली. घटना कळतात भीमा वाणी याच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मयताच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
खून प्रकरणात अटक
18 एप्रिल 2017 रोजी शनीपेठ परिसरात एका पत्त्याच्या क्लबमध्ये प्रवीण उर्फ नितीन सुरेश माळी या तरुणाच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भीमा उर्फ पंकज वाणी याच्यासह राहुल सपकाळे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून भीमा हा कारागृहात बंदी म्हणून होता.
