चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार करणार्या आरोपींचे वाहन सापडले : दोन जिवंत काडतूसासह कोयता जप्त
वाहनातून दोन जिवंत काडतूसासह कोयता जप्त : आरोपी मात्र पसार
Vehicle of accused who fired at former corporator found in Chalisgaon: Koyta seized with two live cartridges चाळीसगाव : चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू) मोरे यांच्यावर पांढर्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांनी पाच ते सहा गोळ्या झाडल्याचा प्रकार बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजेदरम्यान घडला होता. गोळीबारानंतर हल्लेखोर कारने पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना हल्लेखोरांचे वाहन सायगव्हाण (नागद-कन्नड रस्त्यावर) जवळ सापडले आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन जिवंत काडतूस व कोयता व दोन रीकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत.
अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा
गोळीबार प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुरनं. 56/2024 भादंवि 307, 120 (ब), 143, 144, 147, 148, 149 शस्त्र अधिकलम 3/24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपींचा कसून शोध
गोळीबारानंतर आरोपी नागद-कन्नड रोडवर पसार झाल्यानंतर पोलिसांना सायगव्हाणनजीक आरोपींची कार सापडली आहे. या कारची झडती घेतल्यानंतर त्यात कोयता, दोन जिवंत काडतूस तसेच झाडलेल्या दोन गोळ्यांच्या रीकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
