चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार : सात संशयितांविरोधात गुन्हा : कार जप्त

सायगावजनीक संशयितांचे वाहन सापडले : दोन काडतूसांसह कोयता जप्त : आरोपी मात्र पसार


Firing on former corporator in Chalisgaon : Crime against seven suspects : Car impounded चाळीसगाव : चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू) मोरे यांच्यावर पूर्व वैमनस्यातून पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांनी सुमारे आठ गोळ्या झाडल्याचा प्रकार बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजेदरम्यान घडला होता. गोळीबारानंतर हल्लेखोर कारने पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना हल्लेखोरांचे वाहन सायगव्हाण (नागद-कन्नड रस्त्यावर) जवळ सापडले आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन जिवंत काडतूस व कोयता व दोन रीकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सात संशयितांविरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी मोरे यांना अधिक उपचारार्थ नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

सात संशयितांविरोधात गुन्हा
गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (31, लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून सात संशयितांविरोधात गुरनं. 56/2024 भादंवि कलम 307, 120 (व), 143, 144, 147, 148, 149 सह शस्त्रअधिनियम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर अन्य दोघे या कटात सहभागी होते.



मोरे यांची प्रकृती गंभीर !
महेंद्र मोरे यांच्या सहकार्‍यासह त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मोरे यांच्यावर आठ गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला दोन, दंडाला एक आणि एक गोळी छातीला लागली. शिवाय एक गोळी पोटाला चाटून गेल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले. दरम्यान, परीस्थिती लक्षात घेता पोलिसांची अतिरिक्त कुमक चाळीसगावात मागवण्यात आली आहे.

अजय बैसाणे यांच्यावरही फायरिंग !
हल्लेखोरांनी बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे त्यांच्या छातीला, पोटाला आणि पायाला गोळी लागलेली आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले असून मोरे यांच्यावर पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. मोरे यांना वाचविण्यासाठी अजय बैसाणे गेले असता त्यांच्यावर देखील फायरींग करुन परीसरात दहशत माजवून ते सर्व हल्लेखोर शेवरलेट बिट्स कंपनीच्या कारमध्ये बसून पसार झाले.

वाहन सापडले मात्र आरोपी पसार
गोळीबारानंतर हल्लेखोर कारने पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना हल्लेखोरांचे वाहन सायगव्हाण (नागद-कन्नड रस्त्यावर) जवळ सापडले आहे. पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन जिवंत काडतूस व कोयता व दोन रीकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, गोळीबार करणार्‍या आरोपींच्या शोधासाठी चाळीसगाव तालुक्यात कोम्बिंग राबवण्यात आले. हॉटेल्ससह लॉजेस तपासण्यात आल्या मात्र आरोपी पसार झाले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !