भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद : एम.राजकुमार
भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जळगावचे तत्कालीन अधीक्षक तथा सोलापूर पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांनी काढले.
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे सहपरिवार अभिनंदन केले. याप्रसंगी भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचा अधिकृत तिरंगी रंगातील टी-शर्ट देखील धावपटू दाम्पत्यास भेट देण्यात आला.


याप्रसंगी उत्तम धावपटू असलेले स्वतः एम राजकुमार यांनी धावणे किंवा कुठलाही व्यायाम प्रकार सर्वसामान्य माणसासाठी किती आवश्यक आहे याबद्दल देखील सदस्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी रम्या कन्नन यादेखील उपस्थित होत्या. भुसावळ स्पोर्टस् अॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक, डॉ.चारुलता पाटील, प्रवीण वारके, पूनम भंगाळे, डॉ.स्वाती फालक, प्रवीण पाटील या सदस्यांनी सदिच्छा भेट घेतली.