एरंडोल तालुक्यातील दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler thief in Erandol taluka caught by MIDC police जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी एरंडोल तालुक्यातील दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. सुभाष ममराज राठोड (रा.खेडगाव तांडा ता. एरंडोल जि. जळगाव) असे अटकतील चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सिंधी कॉलनी परीसरातून चोरी झालेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

असे आहे चोरी प्रकरण
रवी वासुदेव कुकरेजा यांची मोटारसायकल 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्या घरासमोरुन चोरी झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना दुचाकी चोरट्याबाबत माहिती कळताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. सुभाष राठोड यास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातनू चोरी केलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.



पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !