चाळीसगावातील पोलिस कर्मचारी शुभम आगोणे हत्या प्रकरण : पुन्हा एका आरोपीला अटक


Chalisgaon Policeman Shubham Agone Murder Case : Another Accused Arrested चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक रविवार, 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी झालेल्या किक्रेट स्पर्धेतील वादानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबई पोलिस दलात कार्यरत शुभम अर्जुन आगोणे (28, चाळीसगाव) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पसार असलेल्या सिद्धांत आनंदा कोळी (27, रा.छाजेड ऑईल मिल पाठीमागे, घाट रोड, चाळीसगाव) या संशयिताला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

क्रिकेटच्या वादातून झाली होती हत्या
चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवार, 14 जानेवारीला सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम आगोणे या तरुणाचा वाद झाला होता व त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आल्यानंतर संशयितांनी तलवारीने शुभमवर पाटणारोड रोडवरील बामोशी बााब दर्ग्याजवळ हल्ला केला. या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यानंतर शुभम पाटणादेवी रस्त्यावर पडून होता व नागरीकांना ही माहिती कळताच त्यास चाळीसगाव शहरातील डॉ.देवरे यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.



एका आरोपीला अटक : अटकेतील संशयितांची संख्या नऊवर
जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनातखाली विशेष पोलिस पथकाने संशयित सिद्धांत आनंदा कोळी (27, छाजेड ऑईल मिल पाठीमागे, घाट रोड, चाळीसगाव) यास शिरूड चौफुली, धुळे रोड येथून अटक करण्यात आली. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, पोलिस नाईक राहुल सोनवणे, शिपाई आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, प्रकाश पाटील आदींच्या पथकाने केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !