जिल्हापेठ पोलिसांची कामगिरी : चोरीच्या तीन दुचाकींसह चोरटा जाळ्यात
Performance of District Peth Police : Thief caught with three stolen bikes जळगाव : चोरी केलेल्या तीन दुचाकींसह चोरट्याला जिल्हा पेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चंद्रकांत रामदास साळुंखे (43, रा.हिरा शिवा कॉलनी, जळगाव) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
दुचाकी चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
शेख जाफर शेख अनवर (रा.पिंप्राळा) हे कामानिमित्त दुचाकी (एम.एच.19 बी.ए.7612) ही 28 सप्टेंबर 2023 रोजी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर त्यांनी दुचाकी पार्क केली मात्र ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही आणि गोपनिय माहितीच्या आधारे ही दुचाकी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे यांनी चोरी केल्याची गोपनीय माहिती हवालदार सलीम तडवी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना दिल्यानतंर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.


यांनी केली कारवाई
पोलिस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, जुबेर तडवी, अमितकुमार मराठे, मिलिंद सोनवणे यांनी गुरुवार, 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याला बी.जे. मार्केट परीसरातून अटक केली. त्याने चोरी केलेल्या तीन दुचाकी काढून दिल्या. याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद भोळे करीत आहे.
