जळगावात पुन्हा धाडसी घरफोडी


जळगाव : कुटुंबातील सदस्य झोपले असताना चोरट्यांनी मागच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त करत मुद्देमालाचा शोध घेतला. सोने चांदीचे दागिने, रोकड तसेच मोबाईल असा 49 हजाराचा मुद्देमाल घेत भामटे पसार झाले.

बुधवारी रात्री 11 वाजेनंतर घटना शहरातील सावखेडा बु.॥ शिवारातील कोल्हे हिल परिसरातील जाणता राजा नगरात घडली. गुरुवार, 8 रोजी सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. प्राची हेमराज भावसार यांच्या घरात ही चोरी झाली. या प्रकरणी तालुका पोलिसात गुरुवार, 8 रोजी गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार दिनेश पाटील करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !