दहावी-बारावी परीक्षेसाठी तारखा जाहीर


जळगाव : आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षा महिनाभराच्या उंबरठ्यावर आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान तर माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाइन परीक्षा 20 मार्च ते 23 मार्च दरम्यान होणार आहे.

दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत होईल. दहावीला 57 हजार 110 विद्यार्थी प्रविष्ठ होणार असून यात 32 हजार 378 मुले तर 24 हजार 732 मुलींचा समावेश आहे. बारावीला 48 हजार 273 विद्यार्थी प्रविष्ठ होणार असून यात 27हजार 768 मुले तर 20 हजार 505 मुलींचा समावेश आहे.

दहावीसाठी 143 परीक्षा केंद्र
दहावीसाठी 143 परीक्षा केंद्र असून 799 शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देतील तर बारावीला जिल्ह्यात 78 परीक्षा केंद्र असून 308 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. बोर्डातर्फे प्रत्येक तालुक्यात एक तहसीलदार, एक बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक राहील. यासोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत विभागप्रमुखांचे प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक कार्यरत राहणार आहे.

जिल्ह्यात तीन उपद्रवी परीक्षा केंद्र
जिल्ह्यात दहावीसाठी कासोदा, यावल, फैजपूर येथील परीक्षा केंद्रांना उपद्रवी परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !