जळगावातील निवासी उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला : पसार आरोपीला पाचोरा शहरातून बेड्या


Attack on Resident Sub-District Officer in Jalgaon : Pasar accused handcuffed from Pachora town जळगाव : जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पसार आरोपीला जळगव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा शहरातून अटक केली. विशाल ऊर्फ विक्की नामदेव सपकाळे (रा.शंकरराव नगर, डीएनसी कॉलेज जवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या हल्लाप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
हल्ल्या प्रकरणात विशाल सपकाळे याचा समावेश असल्याने व तो पाचोरा परीसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पोलिस अंमलदार हवालदार विजयसिंग धनसिंग पाटील, हवालदार जितेंद्र राजाराम पाटील, हवालदार नितीन प्रकाश बाविस्कर, हवालदार राजेश बाबाराव मेंढे आदींनी त्याला पाचोरा बस स्थानक परीसरातून अटक करीत नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले.



अवैध वाळू वाहतूक रोखल्याने केला होता हल्ला
जळगावातील निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळू माफियांनी कासार यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार, 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतूक रोखल्याच्या वादातून माफियांनी हा हल्ला केला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !