पाचोर्‍यातील विमा प्रतिनिधीला साडेनऊ लाखांचा गंडा : ट्रेडींगमध्ये नफ्याचे दाखवले आमिष


An insurance representative in Pachora was extorted to the tune of nine and a half lakhs: the lure of profit in trading जळगाव : ट्रेडींगमध्ये पैसे गुंतविण्यास जादा नफा मिळेल, असे सांगून पाचोरा येथी विमा प्रतिनिधीची तब्बल न् लाख 54 हजार 600 रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
राजेश प्रदीपकुमार संचेती (39, रा.पाचोरा) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते विमा प्रतिनिधी म्हणून काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. 14 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2023 दरम्यान त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यावेळी त्यांनी ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष दाखविले



त्यानुसार राजेश संचेती यांनी वेळीवेळी त्यांच्या बँक खात्यातून एकूण नऊ लाख 54 हजार 600 ऑनलाईन पध्दतीने पाठविले. दरम्यान त्यांनी भरलेल्या पैशांचा मोबदला किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !