जळगावातील विवाहितेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा
Molestation of married couple in Jalgaon : Crime against both जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील 23 वर्षीय महिलेचा दोघांनी वियभंग करीत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार 8 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता घडला. पीडीतेने याप्रकरणी रविवार, 11 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयित सुनील राठोड व राहुल राठोड (सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाठलाग करीत केला विनयभंग
सुप्रीम कॉलनी परीसरातील 23 वर्षीय गृहिणी वास्तव्यास आहे. 8 जानेवारी रोजी ती कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर संशयितांनी फुले मार्केट ते टॉवरदरम्यान महिलेचा पाठलाग करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले शिवाय तोंड दाखवण्यास जागा राहणार नाही, अशी धमकीही दिली. तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहेत.


