खामगावात धूम स्टाईल सोनसाखळी लांबवली : जळगावातील आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या


Dhoom style gold chain extended in Khamgaon : Accused in Jalgaon handcuffed by MIDC police जळगाव : खामगाव, जि.बुलढाणा येथे धूम स्टाईल दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी वयोवृद्धेच्या गळ्यातील 20 हजारांची पोत लांबवली होती. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता आईसाहेब मंगल कार्यालयानजीक घडली होती. शोभाबाई सुभाषराव खैरे (65, केशवनगर, खामगाव) यांच्या फिर्यादीवरून खामगावच्या शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित जळगावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला पकडत खामगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे (31, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील कुविख्यात आरोपीचे नाव आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, परीविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, किरण पाटील, मुकेश पाटील आदींच्या पथकाने केली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !