जळगावात दुचाकी चोरींचे सत्र कायम : घरासमोरुन लांबवली दुचाकी


Session of two-wheeler thefts continues in Jalgaon : Two-wheeler extended in front of house जळगाव : घरासमोर हॅन्डल लॉक केलेली सुमारे 50 हजार रुपये किंमतीची होंडा युनीकॉर्न दुचाकी चोरट्यांनी लांबवली. शनिवार, 10 रोजी रात्री 1.50 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

एकनाथ यशवंत पाटील (62) हे सेवानिवृत्त असून लक्ष्मीनगर प्लॉट नं. 9 संचारनगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.क्यू.9797) ही दुचाकी घरासमोर पार्क केल्यानंतर रात्री चोरट्यांनी ती लांबविली. या प्रकरणी एमआयडीसी पोलि ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार गणेश शिरसाळे हे करीत आहेत.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरींचे सत्र दररोज सुरू आहे. दुचाकी चोरट्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्टीवेट असताना पोलिसांना चोरटे गवसत नसल्याने दुचाकी धारक धास्तावले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !