बसमध्ये चढताना वयोवृद्धेची तीन तोळ्यांची पोत लांबवली : अमळनेरातील प्रकार


Elongated three tola texture of an elderly woman boarding a bus : type from Amalner अमळनेर : अमळनेर तालुक्यातील चौबारी गावातील 67 वर्षीय वयोवृद्धेची बसमध्ये चढताना भामट्यांनी तीन तोळे वजनाची मंगलपोत लांबवली. ही घटना सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी पाच वाजता अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाढत्या गर्दीचा फायदा घेत लांबवली पोत
उषाबाई पितांबर पाटील (67, रा.चौबारी, ता.अमळनेर) ह्या वृध्द महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी गावातील नातेवाईकांसह अंत्यविधीसाठी बाहेरगावी निघाल्यानंतर दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ते अमळनेर बसस्थानकात आल्यानंतर अमळनेर-मांडळ बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी उषाबाई पाटील यांच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलमोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तपास हवालदार चंद्रकांत पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !