कार चोरटे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Car thieves in the net of Jalgaon Local Crime Branch जळगाव : कार चोरट्यांना जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. एरंडोल हद्दीतून आरोपींनी ओमनी कार चोरल्यानंतर त्याबाबतची माहिती गुन्हे शाखेला मिळताच संशयितांना अटक करण्यात आली. चंद्रकांत उर्फ गड्या गोरख चौधरी (27) व विशाल लक्ष्मण माळी (25, दोघ रा.अयोध्यानगर, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एरंडोल पोलि ठाण्याच्या हद्दीतून ओमनी कार चोरी झाली होती. कार चोरटे जळगावातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळताच त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. बुधवार, 13 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता अजिंठा चौफुली येथून चंद्रकांत उर्फ गड्या चौधरी व विशाल माळी यांना अटक करण्यात आली.


यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार सुनील दामोदरे, गोरख बागुल, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.
