धरणगावातील चिंतामण मोरया नगरात धाडसी घरफोडी
Daring burglary in Chintaman Morya Nagar of Dharangaon धरणगाव : शहरातील चिंतामण मोरया नगर भागात महिलेच्या बंद घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि रोकड मिळून 25 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
भाग्यश्री गोकुळ नन्नवरे (32, रा.चिंतामण मोरया नगर, धरणगाव) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. भाग्यश्री नन्नवरे यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड असा एकूण 25 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीला आला.


घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री 10 वाजता धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जे.डी.पाटील करीत आहे.
