एमआयडीसी पोलिसांची कारवाई : फार्म हाऊसमधून साहित्य चोरणार्याला बेड्या
MIDC police action : Handcuffs to those who stole material from farm house जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी फार्म हाऊसमधून साहित्य चोरणार्या चोरट्याला अटक केली. आबा प्रकाश भील (24, रा.बुधली धरण, शिरसोली) असे अटकेतील संशयिताचे नावे आहे. ब्रेकर, कटर मशिन व इतर साहित्य आरोपीकडून जप्त करण्यात आले.
एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळील बुधली धरण परीसरात असलेल्या विजयकुमार जयसिंग कोसोदे यांच्या फार्म हाऊसमधून 9 फेब्रुवारी रोजी दोन हजार रुपये किंमतीचे ब्रेकर मशिन, तीन हजार रुपये किमतीचे कटर मशिन, 1200 रुपये किंमतीची हँडकटर मशिन, 1200 रुपये किंमतीचे वायरचे दोन बॉक्स चोरुन नेले होते. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.


संशयित आरोपी आबा प्रकाश भील (24, रा.बुधली धरण, शिरसोली) यास एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अधिकार पाटील, हवालदार समाधान टाकळे, जितेंद्र राठोड, शुध्दोधन ढवळे, मुकेश पाटील, प्रदीप ठाकूर, ललित नारखेडे यांनी ही कारवाई केली.
