रावेरला उद्या आमदार शिरीष चौधरींच्या उपस्थितीत जनता दरबार
रावेर : आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत मंगळवार, 18 रोजी रावेर तहसील कार्यालयात जनता दरबार भरवण्यात येणार आहे. जनतेच्या काही तक्रारी असल्यास उपस्थित राहण्याचे अवाहन रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता रावेर तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरीकांच्या काही तक्रारी असल्यास उपस्थित राहण्याचे अवाहन रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. या दरबारात प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
