निंभोर्यातील तरुणाचा डंपरच्या धडकेने मृत्यू
A young man in Nimbhora died after being hit by a dumper धरणगाव निंभोरा, ता.धरणगाव येथील तरुणाला भरधाव डंपरने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. हा अपघात सोनवद गावाजवळील विहिर फाट्यासमोर घडला. धरणगाव पोलिसात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. छोटू प्रकाश कोळी (35, निंभोरा, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
पायी चालताना डंपरने उडवले
छोटू प्रकाश कोळी हा तरुण आपल्या परीवारासह धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे वास्तव्याला होता. बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास छोटू कोळी हा सोनवद गावाजवळील विहिर फाट्याजवळून पायी जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्या डंपर क्रमांक (एमएच 19 झेड 3505) ने त्यालाजोरदार धडक दिली.


या धडकेत छोटू कोळी याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात डंपर चालक सुभाष शेनफडू कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र कोळी करीत आहे.
