धरणगाव तालुक्यातील वयोवृद्धेची बस प्रवासात पोत लंपास


An elderly woman in Dharangaon taluka died while traveling by bus धरणगाव : बसमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत भामटे सक्रिय झाले आहेत. वाढत्या चोर्‍यांमुळे महिला प्रवासीवर्गात कमालीची घबराट निर्माण झाली आहे. चोपडा येथे जाण्यासाठी बसने निघालेल्या वृध्द महिलेची 18 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवली. ही घटना धरणगाव तालुक्यातील रोटवद फाट्याजवळ लक्षात आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शकुंतला माणिकराव बोरसे (70, रा.फुले नगर, चोपडा) ही वयोवृद्धा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने वृध्द महिला बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी धरणगाव येथे आल्या व नंतर चोपडा जाण्यासाठी धरणगाव येथून बसमध्ये बसल्या. बसमध्ये प्रवास करत असतांना त्यांच्या गळ्यातील 18 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !