जळगावात लग्नाच्या आमिषाने वकिलानेच केला महिलेवर अत्याचार


In Jalgaon, a woman was raped by a lawyer on the lure of marriage जळगाव : लग्न करणार असल्याचे आमिष देत जळगावातील एका वकिलाने शहरातीलच खाजगी नोकरी करणार्‍या 36 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वकिलाविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एका भागात 36 वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे व ती खाजगी नोकरी करते. वकिलासोबत ओळख झाल्यानंतर महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत 15 मार्च 2023 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. हा प्रकार महिलेला सहन न झाल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता संशयित वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !