दिड कोटींची रोकड लूटली : धरणगाव तालुक्यातील प्रकार


One and a half crores of cash looted : Type in Dharangaon taluka धरणगाव : धरणगाव तालुक्यातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारमधून आलेल्या तिघांनी डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल दिड कोटी रुपयांची रोकड लुटून नेल्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापार्‍याची गाडी अडवल्यानंतर संशयितांनी तब्बल दीड कोटींची रोकड लूटण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

धरणगाव पोलिसांची घटनास्थळी धाव
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्री येथे कारमधून नेले जात असताना निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाखाली गाडी येताच अन्य कारमधून आलेल्या तिघांनी संबंधितांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली व लागलीच पैसे असलेली बॅग हिसकावून वार्‍याच्या वेगाने पोबारा केला.



अवघ्या काही मिनिटात झालेल्या रॉबरीमुळे संबंधितांनी कसाबसा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे व सहकार्‍यांनी धाव घेतली. जळगाव गुन्हे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तक्रारदाराने दिलेल्या वर्णनानुसार संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !