जळगाव शहरातील तरुणीची सोशल मिडीयात बदनामी
Jalgaon city girl’s defamation on social media जळगाव : शहरातील एका भागातील 30 वर्षीय तरुणीची सोशल मिडीयातून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परीसरात 30 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान अज्ञात व्यक्तीने ईलेक्ट्रॉनीक साधनाचा वापर करून तरुणीच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावरून तिचा फोटो लावून अश्लिल मजकूर टाकून सोशल मिडीयात व्हायरल करत बदनामी केली. हा प्रकार शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता उघडकीला आला. तरुणीने जळगाव सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार दिलल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहे.


