अमळनेर शहरात शूज सेंटरला आग : 22 लाखांचे नुकसान


Fire at shoes center in Amalner city : loss of 22 lakhs अमळनेर : अमळनेर शहरातील लालबाग शॉपिंग सेंटरमधील श्याम शूज सेंटर या दुकानाला शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागली. पाहता-पाहता संपूर्ण दुकानात आगीच्या ज्वाला पसरल्यानंतर दुकानातील नवीन चप्पल, सॅण्डल, इलेक्ट्रिक साहित्य, फर्निचर आदी साहित्य जळाल्याने सुमारे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

आगीचे कारण अस्पष्ट
अमळनेर शहरात हरीओम हिरानंद पंजाबी (35, रा.सिंधी कॉलनी, अमळनेर) हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे. शूज दुकान चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. या तरुणाचे अमळनेर शहरातील लालबाग शॉपिंग सेंटर येथे श्याम शिव सेंटर नावाचे शूज दुकान आहे. शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता अचानक दुकानातील सामानांना आग लागली. त्यामुळे या आगीत दुकानातील नवीन चप्पल, बूट, सॅण्डल, दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य आदी जळून खाक झाल्याने जवळपासून 22 लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याची माहिती समोर आली नाही, याप्रकरणी रविवार, 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता हरीओम पंजाबी यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक संजय जयंत सपकाळे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !