चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना फिल्म मीडिया नेटवर्कचा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड प्रदान


चाळीसगाव  : शहरातील चित्रकार, कवी व साहित्यीक तथा रेकॉर्ड होल्डर आर्टिस्ट दिनेश चव्हाण यांना फिल्ममोरा नेटवर्कतर्फे कलाक्षेत्रातील कार्यासाठी दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड रविवार, 18 रोजी मुंबई येथे हॉटेल सहारा स्टार येथे रंगारंग कार्यक्रमात रामानंद सागर यांच्या रामायणातील सीतेचे पात्र साकारणार्‍या अभिनेत्री दीपिका यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

सिने कलावंतांची उपस्थिती
यावेळी बॉलिवूड, टॉलीवूड , हॉलीवूड चित्रपटातील दिग्गज अभिनेते अभिनेत्री उपस्थित होत्या. मराठी हिंदी चित्रपट,ट ेलिव्हिजन मालिकेत काम करणार्‍या कलावंतांनीदेखील यावेळी हजेरी लावली होती. अतिशय दिमाखदार असा हा सोहळा झाला. चित्रकार दिनेश चव्हाण यांच्या अनेक कलाकृती तसेच कविता यांना पुरस्कार मिळाले आहेत. 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात देखील त्यांच्या आगळे-वेगळे चित्रप्रदर्शनाने लक्ष वेधले. अनेक साहित्य संमेलनाना त्यांनी बोधचिन्ह आपल्या हस्तकलेतून दिले आहेत, फास्टेस्ट स्केच आर्टिस्ट म्हणून देखील त्यांची नोंद झाली आहे. त्यांचा अधोरेखित हा काव्यसंग्रह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. अनेक शाळेत ते कलेचे मार्गदर्शन देखील करण्यास जातात. अनेक साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रीत म्हणून देखील बोलावण्यात आले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !