अमळनेर येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार


अमळनेर  : सरपंच परीषद, मुंबई महाराष्ट्र तालुका, अमळनेर यांच्यावततीने सरपंच, उपसरपंच व सन्माननीय सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ मराठा मंगल कार्यालयात झाला. उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्याहस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे (मुंबई) होते. माजी आमदार शिरीष चौधरी, राज्य कोअर कमिटीची सदस्य आबासाहेब सोनवणे, राज्य कमिटीचे प्रमुख जे.डी.टेमगिरे, नाशिक विभागीय अध्यक्ष राजमल भागवत, उत्तर महाराष्ट्र विभागीय महिलाध्यक्ष सुषमा देसले-पाटील, जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ, श्रीकांत पाटील, सुरेश पाटील, नितीन पाटील, हिरालाल पाटील यांची उपस्थिती होती.

सरपंच परीषदेच्या मेळाव्याचे आयोजन विभागीय अध्यक्ष सुषमा देसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, जिल्हा समन्वयक चंद्रकांत पाटील, कल्याणी पाटील, महिला तालुकाध्यक्ष शीतल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले. नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र ही देण्यात आले. मेळाव्यास सरपंच-उपसरपंच सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !