यावल-रावेर मतदारसंघात एक कोटींची होणार विकासकामे


आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना आले यश

रावेर : यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत एक कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

या कामांना मिळाली मंजुरी
पाडळसे वॉर्ड क्रमांक पाचमध्ये गटार बांधकाम करणे (8 लक्ष), भालोद इंदिरा नगरमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (15 लक्ष), डोंगरकठोरा अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण व गटार बांधकाम करणे (5 लक्ष), न्हावी येथे अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (5 लक्ष), सांगवी बु अनुसूचित जाती-जमाती वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे (10 लक्ष), बामणोद अनुसूचित जाती-जमाती वस्ती लगत मोठ्या गटारीचे बांधकाम करणे (10 लक्ष), चिनावल येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (10 लक्ष), मुंजलवाडी येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (7 लक्ष), कुंभारखेडा येथे अनुसूचित जाती- जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (5 लक्ष), खिरोदा प्र.यावल येथे अनुसूचित जाती जमाती वस्ती मध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (5 लक्ष), निंभोरा येथे अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (10 लक्ष), थेरोळा येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (5 लक्ष), निंभोरा सीम येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे (5 लक्ष).


कॉपी करू नका.