जामनेर तालुक्यात पेट्रोल पंप मॅनेजरला मारहाण करीत दोन लाख लूटले


In Jamner taluka, petrol pump manager was beaten up and robbed of two lakhs जामनेर : शहापूर, ता.जामनेर येथील पेट्रोल पंप चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील एक लाख 93 हजार पाचशे रुपयांची रोकड लूटण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार, 18 रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्यानजीक घडली. याप्रकरणी जामनेर पोलिसात त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी अडवत लूटली रक्कम
निलेश रतन पवार (36, जामनेर पूरा, जामनेर) हे त्रिवेणी पेट्रोल पंप, शहापूर, ता.जामनेर येथील पंपावर व्यवस्थापक आहेत. रविवारी सायंकाळी ते दुचाकी घराकडे निघाल्यानंतर जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्यानजीक लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी अडवत मारहाण सुरू केली व एक लाख 93 हजार पाचशे रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला. पवार यांनी भेदरलेल्या अवस्थेत नागरीकांची मदत घेत जामनेर पोलिसांशी संपर्क साधून आपबिती सांगितली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे व उपनिरीक्षक गणेश अहिरे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. याप्रकरणी तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन अनोळखींविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !