अमळनेर बसस्थानकातून महिलेची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लांबवली


A gold bangle weighing 25 grams of a woman was recovered from Amalner bus stand अमळनेर : बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने महिलेच्या हातातील 62 हजार पाचशे रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लांबवली. ही घटना अमळनेर बसस्थानकावर सोमवार, 19 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाढती गर्दी चोरट्यांच्या पथ्थ्यावर
अमळनेर बसस्थानकात तक्रारदार भारतीबाई वसंत पाटील (56, एकलहरे, ता.अमळनेर) या बसच्या प्रतीक्षेत असताना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या हातातील 25 ग्रॅम वजनाची व 62 हजार 500 रुपये किंमतीची सोन्याची बांगडी अलगद लंपास केली. काही वेळेनंतर बांगडी हातात नसल्याचा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी अमळनेर पोलिसांना माहिती कळवली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !