बसमध्ये चढताना महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास : भडगावातील प्रकार
Three lakh jewels worn by women while boarding a bus: Bhadgaon variant भडगाव : बसमध्ये चढताना भामट्यांनी महिलेचे पावणेतीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना भडगाव बसस्थानकावर 17 रोजी सायंकाळी सव्वासात वाजता घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बसमधील गर्दीचा फायदा घेत केली चोरी
योगिणी रावन पाटील (38, पांढरद, ता.भडगाव, ह.मु.जळगाव) या महिलेच्या तक्रारीनुसार, 17 रोजी सायंकाळी सव्वासात वाजता भडगाव-एरंडोल बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्सचे बटन उघडून त्यातील पिशवीत ठेवलेले पावणेतीन लाख रुपये किंमतीचे दागिणे लांबवले. पर्समध्ये 32 ग्रॅम वजनाचा चपला हार, 10.30 ग्रॅम वजनाचा नेकलेस, आठ ग्रॅम वजनाचे टोंगल, पाच ग्रॅमचे वेल असा एकूण दोन लाख 83 हजारांचा ऐवज होता. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.


