जळगावात व्यापार्‍याची 37 हजारांची रोकड त्रिकूटाने लांबवली


347 thousand cash of a trader in Jalgaon was extended by the trio जळगाव : जळगावातील व्यापार्‍याला तिघांनी धक्का मारत त्याच्याकडील 37 हजारांची रोकड लांबवण्यात आल्याचा प्रकार शहरातील महात्मा गांधी मार्केटमागे मंगळवार, 20 रोजी दुपारी तीन वाजता घडला. याप्रकरणी तीन जणांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्का मारत लांबवली रक्कम
दीपक तोलाराम हेमनाणी (54, रा.सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दीपक हेमनाणी हे महात्मा गांधी मार्केटजवळ कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी अज्ञात तीन जणांनी धक्काबुक्की करत त्यांच्या खिश्यातून 37 हजारांची रोकड लांबविली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नजीकच्या शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भास्कर ठाकरे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !