जामनेर तालुक्यात पेट्रोल पंप चालकाला लूटले : संशयित जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Petrol pump driver robbed in Jamner taluka: Suspect in Jalgaon MIDC police net जळगाव : जामनेर तालुक्यातील शहापूर येथे पेट्रोल पंप चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील दोन लाखांची लूट करण्यात आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एकाला अटक संशयिताला तपासकामी जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. ऋषिकेश रमेश मावळे (कुसुंबा, ता.जळगाव) असे लूट करणार्‍या संशयिताचे नाव आहे.

व्यवस्थापकाला मारहाण करीत लूटले
जामनेर येथील रहिवासी निलेश रतन पवार हे जामनेर तालुक्यातील शहापूर येथील त्रिवेणी पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्आहेत. पेट्रोल पंपावरील हिशेबाची एक लाख 93 हजार 500 रुपयांची रोकड घेऊन ते 18 फेब्रुवारी रोजी जामनेरच्या दिशेने मोटारसायकलने येत होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर ते शहापूर दरम्यान बेल फाट्यानजीक मोटार सायकलने ट्रिपलसीट आलेल्या तिघा तरुणांनी त्यांची वाट अडवली. निलेश पवार यांना तिघांनी चापटाबुक्यानी मारहाण करत त्यांच्या कब्जातील रोकड जबरीने हिसकावून घेत पलायन केले होते. या घटनेप्रकरणी निलेश पवार यांनी जामनेर पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.



गोपनीय माहितीवरून कारवाई
दरम्यान हा गुन्हा कुसुंबा येथील तरुणांनी केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळाले. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने कुसुंबा येथून ऋषिकेश रमेश मावळे (रा. साईसिटी, कुसुंबा) यास ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने आपला गुन्हा कबुल करत गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल काढून दिली. हा गुन्हा दोघा साथीदारांच्या मदतीने केल्याचे देखील त्याने कबुल केले.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्र पोटे, दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, राजश्री बाविस्कर आदींनी आरोपीला अटक केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !