पुण्यातील कोयता गँगच्या पसार संशयितासह गावठी पिस्टल बाळगणारे चाळीसगावचे पिता-पूत्र जाळ्यात
Chalisgaon father and son who carried Gavathi pistol along with Koyta gang’s Pasar suspect in Pune जळगाव : पुण्यातील कोयता गँगच्या पसार सदस्यासह गावठी पिस्टल बाळगणार्या चाळीसगावातील पिता-पूत्रांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील, दीपक भटू पाटील (रा.श्रीकृष्ण नगर, करगाव रोड, चाळीसगाव) अशी अटकेतील पिता-पूत्राची तर निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी निक्या (रा.लक्ष्मी नगर येरवडा, पुणे) असे शस्त्र पुरवणार्या अटकेतील संशयिताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासात असताना शहर पोलिसांना संशयित निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी हा सराईत गुन्हेगार पुण्यातील येरवडा येथील कोयता गँगचा सदस्य चाळीसगावात आल्याची माहिती मिळाली. संशयिताने 25 डिसेंबर 2023 रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर येरवडा, पुणे भागात हातात कोयते, तलवारी व दगड घेवुन सुमारे 30 ते 35 वाहनांच्या काचा फोडुन परिसरात दहशत निर्माण केल्याने त्याच्याविरोधात येरवडा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. हा गुन्हा घडल्यापासुन निखील शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता. या संशयिताला अटक केल्यानंतर ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील, दीपक भटू पाटील (रा.श्रीकृष्ण नगर, करगाव रोड, चाळीसगाव) यांना गावठी पिस्टलासह पकडण्यात आले. संशयिताने हे शस्त्र बंडी निक्या याच्याकडून 21 हजार 500 रुपयांमध्ये खरेदी केल्याची कबुली दिली. अटकेतील तिघांविरुद्ध चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे उल्लंघण 135 प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व पोलीस कर्मचारी कल्पेश पगार करत आहेत.


यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक योगेश माळी, दीपक पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, योगेश बेलदार, विनोद भोई, नितीश पाटील, निलेश पाटील, नंदकिशेर महाजन, मनोज चव्हाण, विमल सानप आदींच्या पथकाने केली.